बेघर निवारा केंद्रास सांगली पोलिसांकडून जीवनावश्यक वस्तूंची दिवाळी भेट…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका संचलित बेघर निवारा केंद्रातील बेघर लोकांसाठी सांगली शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहर,ग्रामीण, विश्रामबाग तसेच संजयनगर पोलीस ठाण्यांतर्फे तेल,तांदूळ,तिखट यांसह इतर आवश्यक वस्तूंची दिवाळी भेट,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या हस्ते देण्यात आली.

दरम्यान बेघर लोकही आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत.समाजातील इतर घटकांनी वंचित घटकातील लोकांकडेही लक्ष द्यावं आणि त्यांच्याही आयुष्यात थोडासा आनंद द्यावा. असं मत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय.

सदर कार्यक्रमास शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक अजय सिंदकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरिक्षक शिवाजीराव गायकवाड, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरिक्षक एस.के.पुजारी, तसेच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय क्षिरसागर यांच्या सह इतर कर्मचारी,बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here