यवतमाळची दिव्यांग कलावंत कु. मोहिनी डगवार हिने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळची दिव्यांग कलावंत कु. मोहिनी डगवार हिने रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन दिनांक 30 व 31 जानेवारी 2021 रोजी टाऊन हॉल यवतमाळ येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत करण्यात आले आहेत.

रोटरी क्लब ऑफ यवतमाळ व नगर परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे .शनिवार दिनांक 30 जानेवारी 20 21 ला सकाळी 11 वाजता रोटरीचे डिस्टिक गव्हर्नर रोटे. शब्बीर शाकीर व नगराध्यक्ष कांचनताई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनीचे उद्घाघाटन होणार आहे.

कु. मोहिनी डगवार या दिव्यांग कलावंतास प्रोत्साहन देण्यासाठी यवतमाळ करांनी प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी. असे आवाहन प्रकल्प अधिकारी रोटे. अभय देशपांडे व रोटे. राजू पडगिलवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here