एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपा झटका जिल्हा युवा उपाध्यक्ष व दवनिवाडा मंडळ शक्ति केंद्र प्रमुख नामदेवराव बिसेनंनी घेतली हातात चाबी…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकोडी पंचायत समिति गटाचे प्रबळ दावेदार असलेले जिल्हा युवा उपाध्यक्ष व दवनिवाडा मंडळ शक्ति केंद्र प्रमुख नामदेवराव बिसेन यांनी अखेर भाजपाल्या एकाधिकारशाहीला आणि अवमानजनक भूमिकेला कंटाळून पक्षत्याग करीत जनता की पार्टी (चाबी संघटना) मध्ये प्रवेश केला. भाजपा असलेले नामदेवराव बिसेन यांना एकोडी पंचायत समितिची जागा देण्याचे आश्वासन वर्तमान आमदार विजय रहांगडाले दिले होते.

परंतु यावेळी त्यांना उमेदवारी न देता इतर उमेदवाराला देण्यात आली.त्यामुळे नामदेवराव बिसेन यांनी भाजपा सोडून जनता की पार्टीच्यावतीने एकोडी पंचायत समिति मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केला आहे.नामदेवराव बिसेन यांचा जनता कि पार्टीत जनता का आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह इतरांनी स्वागत केले.

नामदेवराव बिसेन यांनी भाजपाला राम – राम ठोकल्यामुळे एकोडी जिल्हा परिषद व पंचयत समिति निवडणुकीवर विपरीत परिणाम होणार अशी चर्चा सध्या मतदाता व कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here