जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..!

रामटेक तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद हायस्कूल, वडांबा येथे शारदा सुनील कोडापे यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी संगीता तभाने ( गटशिक्षणाधिकारी पं.स.रामटेक) शांताताई कुमरे (जि.प.सदस्य) कलाताई ठाकरे (सभापती, पं. स.रामटेक) रविंद्रजी कुमरे (उपसभापती पं.स.रामटेक)पंचायत समिती सदस्य संजय नेवारे, कैलास राऊत,

मंगलाताई सरोदे तसेच विणाताई ढोरे सरपंच, ( गटग्रामपंचायत वडांबा) विजय कोकोडे, मधुकर उईके, भुपेश चव्हाण(के.प्र) डॉ.सुनील कोडापे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विजय थुल यांनी केले. अध्यक्षस्थान शांताताई कुमरे, प्रमुख अतिथीपद कलाताई ठाकरे यांनी भूषविले.याप्रसंगी मान्यवरांनी थोडक्यात विचार व्यक्त करत आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शारदा सुनील कोडापे यांचे अभिनंदन केले.

पुरस्कार स्वीकारताना जबाबदारीही वाढली आहे.,”‘हा केवळ माझा एकटीचा गौरव नाही तर आपणां सर्वांचा गौरव आहे. कुटुंबाचे सहकार्य तसेच मुख्याध्यापक, पदाधिकारी आणि सहकारी यासर्वांचे सहकार्य लाभले, म्हणुनच मी माझे कर्तव्य यशस्वीपणे पार पाडू शकले, अशा शब्दांत कोडापे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

समारोपिय वक्तव्य आणि आभार प्रदर्शन संगीता तभाने, गटशिक्षणाधिकारी (ग.शि,पंस.रामटेक) यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशीगंधा नागदेव यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक शिक्षिका डॉ.यमुना नाखले व शस्वाती गांगुली, विशाल लाडसे (वि.शि.) विरेंद्र चिखलोंढे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here