डहाणू – जितेंद्र पाटील
डहाणू जव्हार रस्त्यालगत कासा गावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावत आहे. तरी वनाधिकारी व महसूल विभागाचा कानाडोळा होतांना दिसत आहे.कासा ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 36 या जागेत ग्रामपंचायत किंवा नगरविकास रचना यांच्या कडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत पणे ईमारत व व्यावसायिक गाळे घरे बांधण्यात आलेली आहेत.
महसूल व वनअधिकारी आणी ग्रामपंचायत यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अर्थकारण केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.स्थानिक लोकप्रतिनिधी यानी देखील वेळोवेळी तक्रारी उपोषण करून देखीलकुठल्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही? तरी सदर ठिकाणी झालेल्या अवैद्य बांधकामांन वर त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी प्रवीण दरेकर यानी पालघर जिल्हाधिकारी व डहाणू तहसीलदार यांच्या कडे केली आहे.

कासा ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत बांधकामाच्या पाहणी करुन अहवाल डहाणू तहसीलदार यांच्या कडे सादर केला आहे.संतोष मते तलाठी सजा कासा.संतोष मते तलाठी सजा कासा व वनविभाग यांच्या संगनमताने टोलेजंग इमारत उभी असुन यांचे व्यापारी वर्गाशी हितसंबंध असण्याची दाट शक्यता आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का? महसुल व वनविभाग अधिकार्यांवर ठोस कार्यवाही झाली पाहिजे अशी संतोष गिंभल यांची मागणी आहे .
संतोष गिंभल (भारतीय जनता पार्टी अध्यक्ष तालुक़ा पालघर पूर्व)