सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाकार्याध्यक्ष पदी बाबासाहेब जाधव यांची निवड..!

बुलडाणा – अभिमान सिरसाट

न दैन्यम न पलायनम हे ब्रिदवाक्य घेवून पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संपुर्ण देशभरात कार्यरत असलेली सरकार मान्यताप्राप्त पत्रकार संरक्षण समितीच्या बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब जाधव यांची निवड संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, महासचिव सिध्दार्थ काळे यांच्या आदेशानुसार जेष्ठ बुलडाणा संघर्ष चे मुख्य संपादक प्रा सुभाष लहाणे(संपादक बुलडाणा संघर्ष), भानुदास लकडे(जिल्हा प्रतिनिधी विदर्भ मतदार),

रमेश चव्हाण(मुख्य संपादक दै.खोज मास्टर) पृथ्वीराज चव्हाण(दैनिक भास्कर), दिनेश मुडे(दै. महाराष्ट्राची हाक),प्रेम राठोड(संपादक विदर्भ प्रेम)सचिन वंत्रोले(जिल्हा प्रतिनिधी दै.नवराष्ट्र) समाधान चिंचोले(संपादक बुलडाणा जागर)व पत्रकार संरक्षण समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष तथा दैनिक लोकमंथन चे निवासी संपादक पुरुषोत्तम बोर्डे आदि मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.

बाबासाहेब जाधव हे दैनिक सम्राटचे प्रतिनिधी असुन त्यांचे वडील स्मृतिशेष नागोराव जाधव गुरुजी यांनी नागपुर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली धम्म दिक्षा सोहळ्यात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन बौध्द धर्माची दीक्षा घेतली व चालु नोकरी सोडून बाबासाहेबांच्या सामाजिक लढ्यात त्यांच्या चळवळीत वाहून घेतले होते.म्हणून त आजतागायत सर्व सामान्य जनतेच्या न्यायासाठी आपली लेखणी निर्भीडपणे चालवतात तर ते सामाजिक श्रेत्रात निस्वार्थ पणे आपले योगदान कायम देत असतात, तर गोरगरीब गरजू ना मदतीचा हात देतात.

त्यांनी हजारो एसटी कामगार बांधवांसाठी सक्रीय आंदोलने केली आहेत.आता ते पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी नक्कीच लढतील असा आशावाद प्रा.सुभाष लहाणे यांच्यासह पत्रकार बांधवांनी केला.बाबासाहेब जाधव यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाकार्याध्यक्षपदी निवड होताच संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here