पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर…

नांदेड जिल्ह्यात १२३ मतदान केंद्र

नांदेड – महेंद्र गायकवाड

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक मतदान प्रक्रीया जिल्ह्यात सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मतदान केंद्रनिहाय तयारी पूर्ण झाली आहे. कोविड-19 अंतर्गत विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली.

जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ करता यावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल यासाठी 907 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या प्रक्रीयेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्राथमिक चाचणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक केंद्रावर एक हजाराच्या आतच मतदार संख्या ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाची थर्मल चाचणी केली जाईल ज्यांचे तापमान अधिक असेल अशा मतदारांना त्याच बुथवर सुरक्षीत मतदानाची सुविधा असेल. ग्रामीण भागातील मतदारांसाठी सर्कलनिहाय मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून या सर्व मतदान केंद्राची पाहणी निवडणूक विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here