जिल्हा प्रशासन व शिक्षक संघटना हातात हात घालून शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणार – प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड…

सांगली – ज्योती मोरे

मंगळवार दिनांक 12/10/2021 रोजी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार शिक्षणाधिकारी श्रीयुत संजयकुमार राठोड व प्रभारी उपमुख्य लेखाधिकारी श्रीमती शेळके मॅडम यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले व प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून प्रश्न मार्गस्थ करण्याचीविनंतीकेली.

जिल्ह्यातील रिक्त केंद्रप्रमुख पदे अभावितपणे तात्काळ भरावीत अशी मागणी करण्यात आली कारण प्रशासनाच्या सोयीसाठी खिरापत वाटल्या सारखी कोणतेही निकष न लावता प्रभारी केंद्रप्रमुख पदांची वाटणी करण्यात आली यामुळे काम कमी आणि उद्योग जास्त असा प्रकार बऱ्याच तालुक्यांमध्ये सुरू आहे.

यामुळे पात्र केंद्रप्रमुख यांची भरती अभावितपणे तात्काळ करणे गुणवत्तेसाठी गरजेचे आहे यावर संच मान्यतेचा विचार करून लवकरच केंद्रप्रमुख पदे अभावितपणे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू असे शिक्षणधिकारी यांनी सांगितले.मागणी केलेल्या कार्यरत विषय शिक्षकांना रिव्हर्शन तात्काळ द्यावे अशी आग्रही मागणी केली. त्यावर 2020/21 संच मान्यतेचा मंजुर पदांचा आढावा घेऊन तात्काळ रिव्हर्शन देऊ काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील माॅडेल स्कूल मधील काही वरिष्ठ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे. तो कमी करण्यात यावा कारण पालकमंत्री महोदय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पथदर्शी व गुणवत्तापूर्ण प्रयोग संपूर्ण जिल्हाभर सुरू असताना वरिष्ठ मुख्याध्यापक पदाचा कार्यभार अधिक केंद्रप्रमुखकांचा प्रभारी कार्यभार यामुळे कामकाज करताना तारेवरची कसरत होत आहे.

तसेच त्यांच्या कामकाजाला मदत म्हणून केंद्रातील इतर शाळाच्या शिक्षकांची कामगिरी काढून कामकाज केले जात आहे. यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत होत असून अशा वरिष्ठ मुख्याध्यापकांना अतिरिक्त दिलेले केंद्रप्रमुख यांचे काम काढून घेऊन सध्या कार्यरत मॅाडेल स्कूलचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याची संधी त्यांना पूर्णवेळ देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावर आढावा घेऊन तात्काळ निर्णय घेऊ असे सांगितले.

बऱ्याच वर्षापासून निवड श्रेणी प्रस्ताव मंजुरी पासून प्रलंबित आहेत त्यासाठी आधिक वेळ लागणार असून इतर सहाय्यकांची टीम तयार करून निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्याच्या कामाचा निपटारा करू असे शिक्षणाधिकारी महोदयांनी सांगितले.निवडश्रेणी व चट्टोपाध्याय वेतनश्रेणीसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पूर्ववत तात्काळ सुरू करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. यावर जिल्हा प्रशिक्षण संस्थेला डाइटला लेखी पत्र व मागणी देऊन पुढील कार्यवाही करण्याचे संबंधितांना सांगितले.

शैक्षणिक गुणवत्तेसारख्या व विधायक उपक्रमासाठी संघटनांची ठोस व भरीव मदत घेतली जाते मात्र कार्यक्रमास निमंत्रित केले जात नाही. याविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करावे. अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली त्यासाठी सर्व संघटनांची लवकरच बैठक बोलावून जिल्हा प्रशासन व संघटना हातात हात घालून जिल्ह्याची गुणवत्ता वाढविण्याचे नियोजन करू तसेच पुढील कार्यक्रमास सर्व संघटनांना निमंत्रित करू असे आश्वासन शिक्षण विभागातून देण्यात आले.

सप्टेंबर पेड ऑक्टोंबर महिन्याचा मासिक पगार अदा करण्याची मागणी करण्यात आली यावर शिक्षणाधिकारी श्रीयुत राठोड व लेखाधिकारी श्रीयुत चव्हाण यांनी कोषागार कार्यालयात बीले मंजुरीसाठी गेलेली आहेत एक-दोन दिवसात मंजूर होताच पुढील कारवाई करू शासनाकडून पुरेसा निधी उशिरा येत असल्यामुळे पगार मागेपुढे होत असून सीएमपी प्रणाली नुसार मासीक पगार करण्याचे नियोजन कोटक महिंद्रा बँकेसोबत चर्चा करून अंतिम आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले,

असून सीएमपी प्रणालीनी पगार करण्याचे काम गतीने करू दीपावलीपुर्वी मासिक ऑक्टोबर महिन्याचा पगार दीपावली सणअग्रीम देण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली यावेळी पगार दीपावली पूर्वी करून सन अग्रिमची रक्कम मागणीनुसार एकवट करून शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास तात्काळ आदा करण्यात येईल असे सांगण्यात आले.

प्रॉव्हिडंट फंडाच्या हिशोब चिठ्ठ्या तात्काळ मिळाव्यात यावर उपमुख्य लेखाधिकारी शेळके मॅडम यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली हिशोब चिठ्ठ्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले असून व्याज आकारणीचे तांत्रिक काम राहिलेले आहे ते तात्काळ पूर्ण करून जिल्हा परिषदेच्या ई-मेल वर पहिल्यांदा हिशोब चिठ्ठ्या डाऊनलोड केल्या जातील त्यानंतर हरकती घेऊन सर्व हिशोब चिठ्ठ्या शाळास्तरावर वितरित करण्याचे नियोजन वित्त विभागाच्या माध्यमातून गतीने सुरू असल्याचे सांगितले जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव या शाळेतील कोर्ट कामकाजाचा शिक्षणाधिकाऱ्यांनी समक्ष कागदपत्रे पाहून आढावा घेतला संबंधितांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

तसेच जत तालुक्यातील कन्नड विभागाच्या वरिष्ठ मुख्याध्यापकांचे समुपदेशन शिक्षक संघाच्या मागणीनुसार पार पाडले त्याबद्दल जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देण्यात आले.यावेळी चर्चा करीत असताना मा शिक्षणाधिकारी महोदयांच्या अष्टपैलूत्वाची चुणूक यावेळी दिसून आली.

त्यानी विविध विषयांचा परामर्श घेऊन शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यां बरोबर शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी दिलखुलास चर्चा केली सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता नेटाने वाढवण्यासाठी आपण सर्वजण निष्ठेने प्रयत्न करू असे सांगितले यावेळी शिक्षण विभागाचे अधीक्षक श्रीयुत मोहिते आबा उपस्थित होते.यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष विकास शिंदे यांनी केले.

यावेळी जिल्हा संघाचे सरचिटणीस सुनील गुरव जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष सुरेश पवार पार्लमेंटरी बोर्डाचे सरचिटणीस वसंत सावंत जिल्हा संघाचे कोषाध्यक्ष राजू राजे जत तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर वाळवा तालुकाध्यक्ष बा स पाटील मिरज तालुकाध्यक्ष दयासागर बन्ने सांमिकु मनपा अध्यक्ष सुरेश शिंगाडे मिरज तालुका सरचिटणीस माणिक माळी ज्येष्ठ सल्लागार अशोक परीट तासगाव तालुकाध्यक्ष रघुनाथ जाधव कवठेमंहाकाळ तालुकाध्यक्ष ज्ञानू जानकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here