मंत्री जोल्ले यांच्या हस्ते जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त डी.ए.मुराळी यांचा सत्कार…

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री..
निपाणी तालुक्यातील सुळगाव प्राथमिक शाळेतील शिक्षक श्री डी ए मुराळी यांना कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ बेंगलोर आणि उपनिर्देशक कार्यालय चिक्कोडी यांच्यावतीने नुकताच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे .कर्नाटकच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार सौ शशिकला जोल्ले या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी सुळगाव ता. निपाणी येथे आल्या असता शिक्षक डी ए मुराळी यांचा सत्कार त्यांनी केला

सत्कार प्रसंगी डी ए मुराळी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले सुळगाव गावामध्ये जवळपास वीस वर्षे प्रामाणिकपणे आणि तळमळीने केलेल्या कार्याचे ते फळ आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून शाळेतील माझ्या सहकाऱ्यांनी केलेले मार्गदर्शन व सहकार्य तसेच गावाने दाखवलेला आदर, सन्मान यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळाली .

त्यामुळे हा पुरस्कार माझ्या शाळेला व गावाला समर्पित करतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करत गेल्यास यश हे नक्कीच मिळते.
शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास ज्ञानार्जनाच्या पलिन कार्यातून करणे हे माझे मी कर्तव्य समजतो.यासाठी माझी धडपड असते. ज्ञानार्जनाच्या कार्यात गुंतून राहणे समाजकार्यात आपल्यापरीने कार्यरत राहणे हे मला आवडते असे ते म्हणाले.

याप्रसंगी एच डी एम सी अध्यक्ष डॉ गोरखनाथ चौगुले, उपाध्यक्ष बाबासो मगदूम ,नवनाथ चौगुले, अशोक पाटील वीरेंद्र पाटील तात्यासो नलवडे यशवंत पवार महादेव शिरोळे, अशोक कांबळे ,आप्पासो कांबळे ,गौतम पवार, तानाजी गुरव, उमेश पाटील यांच्यासह मुख्याध्यापक श्री मोरे सर व इतर शिक्षक किल्लेदार सर ,लोखंडे सर ,जाधव सर ,चौगुले सर तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here