पालघर जिल्हा केंद्रीय पत्रकार संघामार्फत विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप…

पालघर – विनायक पवार

केंद्रीय पत्रकार संघ पालघर जिल्हा मार्फत आज डहाणू तालुक्यातील पळे बोरीपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील किशोरवयीन विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकिन्स चे वाटप करण्यात आले.

केंद्रीय पत्रकार संघाचे देशभरात हजारो सदस्य असून ही संघटना पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि न्याय हक्कासाठी सातत्याने अग्रेसर असते.त्याच बरोबर सामाजिक जाणीव म्हणून वेळोवेळी समाजातील गरिबांना विविध प्रकारे मदत करीत असते.

याच सामाजिक भावनेतून पालघर जिल्हा पत्रकार संघातर्फे डहाणू तालुक्यातील दुर्गम आदीवासी भागातील पळे बोरीपाडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील ५० किशोरवयीन विद्यार्थीनीना वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी नॅपकिन्स डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला,गट विकास अधिकारी बी.एच.भरक्षे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर,गटशिक्षण अधिकारी बाबुराव राठोड,केंद्रीय पत्रकार संघ पालघर जिल्हा अध्यक्ष विनायक पवार उपस्थित राहून या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रजवलन करून व देवी सरस्वती आणि क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

या नंतर सर्व प्रमुख मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थीनीना संबोधित करताना सार्वजनिक स्वच्छतेसोबतच स्वतः ची वैयक्तीक स्वच्छता बाळगून आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उदाहरणे देऊन व महत्व पटवून देऊन विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.याचबरोबर दीड वर्षांनंतर सध्या शाळा सुरू होत आहेत त्यामुळे सर्वांनी कोरोनाचे नियम पाळत सर्व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सपना डिसोझा यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधापक महेंद्र सावंत यांनी केले.त्याच बरोबर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख अस्मिता पाटील व शाळेतील सर्व शिक्षक वर्गनी विशेष परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here