गुंदावे गावात आदिवासी कुटुंबांना रेशनिंग कार्डांचे वाटप…जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील यांच्या पाठपुरावा…

मनोर – पालघर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत हद्दीतील गुंदावे या आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या गावातील अनेक कुटुंबांकडे रेशनिंग कार्ड नसल्याने धान्य आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता. याबाबत शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या विनया पाटील यांना माहिती मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी या कुटुंबांकडून नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून घेतली. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पालघरच्या तहसीलदार कार्यालयात पाठवुरवा करीत नवीन रेशकार्ड तयार करून घेतले होते.

नुकताच एका गुंदावे गावातील एक छोटेखानी कार्यक्रमात सुमारे 40 कुटुंबांना नवीन रेशनकार्डांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच नितेश पाटील, युवा सेनेचे अमेय पाटील आणि ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here