राज्य पत्रकार संघाद्वारे “कोरोना योद्ध्यांचा “गौरव युवा रूरल असोसिएशन ,नागपुरद्वारे औषधी व साहित्य वाटप…

राजू कापसे – रामटेक

कोरोना विषाणूच्या या महामारीच्या काळात पोलिसांनी “फ्रंटलाईन योद्धा” म्हणून केलेले कार्य त्यांची कर्तव्यनिष्ठा दर्शविते.एकाचवेळी त्यांना अनेक आघाड्यांवर कार्य करावे लागते.त्यांच्या कार्यापासून समाजातील तरूणांनी प्रेरणा घ्यावी असा या गौरव करण्यामागचा उद्देश असल्याचे प्रतिपादन महाराष्र्ट राज्य पत्रकार संघाचे नागपुर जिल्हाध्यक्ष वसंत डामरे यांनी केले.

महाराष्र्ट राज्य मराठी पत्रकार संघ ,नागपुर जिल्हा(ग्रामिण) व युवा रूरल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने पोलिस स्टेशन रामटेक येथे पोलिस अधिकारी,कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान यांचा “कोरोना योद्धा” म्हणून गौरव आणि औषधी व सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.

ठाणेदार दिलिप ठाकूर,सहायक पो.नि.निशा भूते,ऊपनिरिक्षक प्रमोद कौळेकर, ऊपनिरिक्षक श्रीकांत हत्तीमारे,परिविक्षाधिन उपनिरिक्षक सिमा बेद्रे, म.रा.पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ सरचिटणीस शरद नागदिवे,प्रसिद्धीप्रमुख कैलास निघोट,नागपुर जिल्हा ग्रामिण क्रिडा अकादमीचे अध्यक्ष अॅड.संजिव खंडेलवाल,तालुका वकील संघाचे सचिव अॅड.महेंद्र येरपुडे,युवा रूरल संस्थेचे डायरेक्टर जनरल दत्ता पाटील,प्रोग्रॅम समन्वयक बुर्‍हाणूद्दीन बोहरा

प्रकल्प समन्वयक साहेबराव सोमकुॅंवर,पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अशोक सारंगपुरे, तालुकाध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष राजुभाऊ कापसे,राहूल पिपरोदे,अमोल खडोतकर,जगदीश सांगोडे,आकाश सहारे,रूपेश वनवे,महासचिव रामरतन गजभिये,संदिपकुमार उरकुडे,रितेश बिरणवार ,सुनिल कोल्हे, यावेळी उपस्थित होते.यावेळी एकूण ८० अधिकारी व कर्मचार्‍यांचा प्रमाणपत्र आणि औषधी ,सुरक्षा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा रूरलचे दत्ता पाटील,ठाणेदार दिलिप ठाकूर यांनी कोरोना महामारी काळात पोलिसांनी कशाप्रकारे काम केले याची माहिती दिली.प्रास्ताविक वसंत डामरे यांनी ,संचालन सपोनि निशा भूते यांनी तर आभार प्रदर्शन उपोनि प्रमोद कोळेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here