संचालकांनी राजकारण विरहित संस्था चालवावी; युवा नेते उत्तम पाटील यांचे प्रतिपादन…

राहुल मेस्त्री

संस्थाचालकांनी राजकारण बाजूला ठेवून राजकारण विरहित संस्था चालवावी असे प्रतिपादन निपाणी भागचे युवा नेते उत्तम पाटील यांनी कोगनोळी येथे जय किसान पीकेपीएस च्या उद्घाटन समारंभात बोलत होते .

यावेळी ते पुढे म्हणाले निपाणी परिसरात आपल्याकडे एकूण 11 पिकेपीएस मंजूर करण्यात यावे असा प्रस्ताव आला होता .त्यापैकी सात पिकेपीएस आपण मंजूर केल्या असून उर्वरित काही अडचणीमुळे प्रलंबित आहेत त्या देखील लवकरच पूर्णत्वास येतील.

त्याचबरोबर यास संस्था मंजूर करण्यामागे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकिहोळी आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष उमेश कत्ती यांचा आशीर्वाद आहे. ज्याप्रकारे बोरगाव पीकेपीएस राज्यात नंबर एकची आहे त्याच प्रमाणे कोगनोळील जय किसान पीकेपीएस देखील नावारूपास येईल असा विश्वास व्यक्त केला .व पहिल्याच टप्प्यात ह्या संस्थेला दीड कोटी कर्ज मंजूर झाले ही खूप मोठी बाब आहे असे मनोगत उत्तम पाटील यांनी केले.

प्रारंभी उत्तम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत जय किसान पिकेपीएस चे उद्घाटन फित कापून करण्यात आले.आणि शिव स्मारक कोगनोळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

.तर उद्घाटक उत्तम पाटील यांचा सत्कार कोगनोळी जय किसान पीकेपीएस अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना उमेश पाटील म्हणाले जय किसान संस्थेचे 277 सदस्य आहेत.

पहिल्याच टप्प्यात दीड कोटी कर्ज मंजूर झाले असून यामध्ये चार गुंठे ते 18 एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सभासद म्हणून सामील केले गेले आहे. ही संस्था शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळात काम करणार असून भविष्यात विहिर काढण्यासाठी देखील कर्ज देण्याचा प्रयत्न करणार आहे .

असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे सचिन खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी प्रवीण पाटील, महेश पाटील, सी के पाटील, विश्वनाथ पाटील ,योगेश पाटील ,प्रकाश गायकवाड ,बाळासाहेब पाटील यांच्यासह कोगनोळी व परिसरातील अरिहंत ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत अरिहंत ग्रुप गटाकडून निवडणूक आलेले नुतन ग्रामपंचायत सदस्यशोभा माणगावे ,मनिषा सचिन परीट आणि सुजित माने यांचा सत्कार करण्यात आला.आभार व सूत्रसंचालन के डी पाटील यांनी केले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here