युवा सेनेकडून कुंभवली परिसरातील दहा गावांमध्ये सुगंधी उटण्याचे वाटप…

मनोर – कोरोनाच्या महामारीच्या काळात आलेली यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार शिवसेनेच्या युवा सेनेचे सुमीत पिंपळे यांनी बोईसर पाश्चमेकडील कुंभवली परिसरातील दहा गावांमध्ये सुगंधी उटण्याचे वाटप केले.

कुंभवली, एकलारे, मुरबे, पाम, टेंभी,नवापूर, आलेवाडी, गुंदवली आणि कोलवडे गावातील कुटुंबाना दिवाळीच्या अभ्यंगस्नानासाठी उटणे वाटप करण्याचा कृतीशिल उपक्रम शिवसेनेकडून राबविला जात असल्याचे सुमीत पिंपळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्या वैदेही वाढाण,माजी पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here