रोटरी क्लब मार्फत अंगणवाडीच्या मुलांना फराळाचे वाटप…

मनोर – बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे रोजच्या जेवणाची आबाळ असलेल्या कुटुंबांच्या घरात दिवाळीचा फराळ तयार केला जात नाही. त्यामुळे दिवाळी सण साजरा होत असताना ग्रामीण भागातील गरीब कुटूंबाना आनंदापासून वंचित राहावे लागते.

त्यांना दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेता यावा आणि त्यांची दिवाळी गोड करण्याचा रोटरी क्लबचा प्रयत्न असतो. यंदा पालघरच्या रोटरी क्लब मार्फत मंगळवारी (ता.10) गुंदावे,साये, पडवळ पाडा, मस्तान नाका आणि टाकवहाळ येथील अंगणवाडीतील 250 मुलांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब पालघरचे अध्यक्ष निनल शहा, सचिव जयेश आव्हाड, खजिनदार स्वाती पाटील,प्रकल्पप्रमुख विनिता पाटील,डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट डायरेक्टर भगवान पाटील,डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रफिक लूलानिया,क्लब डायरेक्टर हेमंत वारैया,रोटरी क्लब ऑफ मनोरचे अध्यक्ष विलास पाटील,उपेन वर्मा आणि सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here