कोगनोळी प्रभाग क्रमांक एक मध्ये जिवनावश्यक वस्तुंचे वितरण…

राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील प्रभाग क्रमांक एक फ्रेंडस् सर्कल यांच्या वतीने येथील मुस्लिम बांधवांना ग्रामपंचायत सदस्य सुनिल माने ,ग्रामपंचायत सदस्य सुजीत माने यांच्या हस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते तौसिफ मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत जिवनावश्यक वस्तुंचे वितरण दि. 06 रोजी करण्यात आले.

या प्रभागामध्ये मुस्लिम ब़ाधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुनील माने व येथील फ्रेंडस् सर्कल तरुण मंडळाच्या वतीने प्रत्येक वर्षी रमजान ईदनिमित्त इफ्तार पार्टीचे नियोजन करण्यात येत असते.मात्र यंदाही या रमजान इफ्तार पार्टीवर कोरोनाचे संकट पडल्याने इफ्तार पार्टी रद्द करावी लागली आहे.

यावर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेऊन त्यानी इफ्तार पार्टीला बगल देऊन मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे आहार किट व श्रीखंड वाटप केले.यावेळी स्वागत व प्रास्ताविक शिवाजी माने यांनी केले.तर शेवटी आभार तौसिफ मुल्ला यांनी मानले.याप्रसंगी सौरभ कगुडे, दिलावर बहिरवाडे, अरविंद मगदूम, विशाल स्वामी, पंकज माने, अखिलेश माने, उत्तम माने, निलेश मगदूम, प्रीतम शिंत्रे यांच्या सह मुस्लिम बांधव, महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here