पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लबच्या वतीने सत्कार…चॉकलेट,प्रमापत्र,आर्सेनिक अल्बम आणि मास्कचे वाटप…

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विरोधात लढणारे पोलीस, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी सत्कार करण्यात आला.रोटरी क्लबच्या मनोर हायवे शाखेमार्फत हा सत्कार करण्यात आला.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस, डॉक्टर,आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी धोका पत्करून पहिल्या फळीत लढत आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी डिस्ट्रीक रोटरी क्लब ऑफ पालघर आणि रोटरी क्लब मनोर हायवे तर्फे त्यांना चॉकलेट बॉक्स प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आर्सेनिक अल्बम गोळ्या आणि मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब मनोरचे प्रेसिडेंट विलास पाटील, व्हाईस प्रेसिडेंट मोमेज रइस,सेक्रेटरी प्रशांत घरत ,डॉ अविनाश सोनावणे,श्रध्दा पावडे,निलेश पाटील,डॉ जितेंद्र शितनामे,रवींद्र पाटील,आणि डॉ अदिती गायकवाड उपस्थित होते.पालघर जिल्हा रोटरी क्लबचे प्रेसिडेंट निनाद शहा आणि रफीक सुलानिया यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here