मिरजमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने पुरस्कारांचे वितरण…

सांगली – ज्योती मोरे

मिरज मधील श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती लिंगायत मठाच्या वतीनं, लिंगायत जोडो पोटजात तोडो या उपक्रमाअंतर्गत लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजाती मधील लोकांच्या मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं.सदर मेळाव्यात सुरेश शेटे, महादेव तेली यांना लिंगायत धर्मप्रसाराबाबत तर रमेश कुमार मिठारे यांना पत्रकारितेसाठी, डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी यांना उत्कृष्ट वक्त्या म्हणून, बसव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

शिवाय भारत सरकारच्या हेवी इंडस्ट्रीजचे संचालक डॉक्टर रवींद्र आरळी, आर.टी.ओ. शिवानी सगरे, डॉक्टर कपिलेश्वर गुळभिले, आणि वेदिका हारगे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जगद्गुरु श्री गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महास्वामीजी निमसोड कोळे, श्री गुरुमूर्ती गुर निर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महास्वामी 31वे मठाधिपती केज, श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती उर्फ विजय कुमार महास्वामीजी मिरज,

चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी मासोलीकर महाराज मासोली, श्री महादेव महाराज महास्वामीजी हिंगणगाव, यांच्यासह सुदर्शन बिराजदार, बसवराज कनजे, मच्छिंद्र भोसले, सुहास मजती, आदी मान्यवरांसह वाणी,तेली,कोष्टी,कुंभार, माळी, जंगम या जातींमधील समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचं संयोजन महादेव चिवटे,प्रदिप वाले,गणेश नकाते आदींनी केलं होतं..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here