कोरोना संकटकाळात जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर असलेल्या पोलिस बांधवांना विसावा हॉटेल च्या वतीने मोफत चहा नाश्ता पाणी बॉटल चे वाटप…

दर्यापूर – संपूर्ण देशात कोरोना च्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात हाहाकार केला आहे. त्यात दिवसेंदिवस प्रत्येक नागरिकांचे कोरोना मुळे मृत्यू सुद्धा होत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात कडक लॉक डाऊन 15 मे पर्यंत घोषित करण्यात आले होते.

परंतु प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे आता ते 30 मे पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने नुकताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे जनतेने शासनाला सहकार्य करा घरीच राहून सुरक्षित राहावे असे सुद्धा आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण देशावर कितीही मोठे संकट आले तरी पोलीस बांधव हे मात्र अहोरात्र जनतेच्या सेवा करण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात.

आतासुद्धा संपूर्ण देश लागतो नसूनसुद्धा एकही व्यक्ती हा रस्त्यावर दिसत नाही परंतु आपल्या परिवाराची मुलाबाळांची कुठलीही काळजी न करता पोलीस बंधू आजही सुद्धा रस्त्यावर तैनात आहे.

त्यांनासुद्धा थोडासा विसावा मिळावा म्हणून आज विसावा हॉटेल चे संचालक किरण उर्फ विक्की होले, व आकाश नारे यांच्या वतीने दर्यापूर शहरातील चौकाचौकात बंदोबस्तात असल्याने पोलीस कर्मचारी पोलिस स्टेशन मधील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत चहा नाश्ता पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी सर्व पोलीस बांधवांनी हॉटेल विसावा च्या संचालकांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here