गरजवंत कुटुंबियांना करणार पाण्याच्या १०१ माठांचे वाटप…

भा.ज.पा. अकोला जिल्हाअध्यक्ष मा. आमदार.श्री रणदीरजी सावरकर यांच्या वाढदिवसा निमित्त…

फ्रीज घेणे दुरापास्त असणाऱ्या गरजवंतांना १०१ माठांचे वितरण करून भा.ज.प चे जिल्हाध्यक्ष व लोकप्रीय आमदार रणधीर सावरकर यांचा वाढदिवस भा.ज.प शहर व तालूका भा.ज.यु.मो शहर व तालूका अमित नागवान मित्र परिवार बुधवारी १४ एप्रील रोजी साजरा करणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, अकोल्याचे माजी महापौरव मूर्तिजापूर न.प. निरिक्षक विजय अग्रवाल,न.प नगराध्यक्ष मोनाली क.गावंडे,शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भा.ज.यु.मो.जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,

तालूकाध्यक्ष भूषण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात गरजू परिवारांकरिता ग्रिष्मऋतूतील कडाक्याच्या उन्हाळ्यात गार पाण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेता १०१ मटक्या चे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बुधवारी १४ एप्रीलला तो आंमलात आणला जाईल. भा.ज.प शहर व तालुका, भा.ज.यु.मो.शहर व तालुका तथा अमित नागवान मित्र परिवार तर्फे मंदीरे, मशिदी, दवाखाने अशा सार्वजनिक ठिकाणी हा उपक्रम राबविणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here