सांडपाण्याच्या दुर्गंधी वरून दोन कुटुंबात वाद;परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल…

गावात तणावपूर्ण शांतता,पोलिसांच्या चोख बंदोबस्त.

लाखांदूर – नास्तिक लांडगे

सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीत शौचालयाचे पाणी सोडून परिसरात दुर्गंधी निर्माण झाल्याने दोन कुटुंबात वाद होऊन लाखांदूर पोलीसात परस्पर विरोधी तक्रारी करण्यात आल्याने दोन्ही कुटुंबाचे विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर गुन्हा अंतर्गत एका कुटुंबाचे विरोधात ॲट्रॉसिटी तर दुसऱ्या कुटुंबाचे विरोधात अश्लील शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने लाखांदूर प्लाट येथील प्रभाग क्र.6 मध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. सदर घटना मागील 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच ते रात्री नऊ वाजता दरम्यान घडली.

पोलीस सूत्रांनुसार मागील 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास लाखांदूर प्लाट येथील प्रभाग क्रमांक सहा मधील चित्रीवेकर व तांडेकर या दोन कुटुंबात गटारातील सांडपाण्याच्या दुर्गंधीवरुन वाद झाला.यावेळी दोन्ही कुटुंबातील काही महिला पुरुष व मुलांनी परस्परांना जातीवाचक व अश्लील शिविगाळ केली.

यावेळी दोन्ही कुटुंबांनी लाखांदूर पोलिसात धाव घेत घडलेल्या घटने संबंधाने परस्पर विरोधी तक्रारी केल्या. यावेळी दोन्ही कुटुंबाचे बहुसंख्य समर्थकांनी लाखांदूर पोलिस स्टेशन पुढे मोठी गर्दी केल्याने येथील ठाणेदार यांनी तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन अधिक पोलिस कुमक मागवीत जमावाला हाकलून लावले.

यावेळी एका कुटुंबातील फिर्यादी महिला रंजना अरुण तांडेकर(35) यांच्या तक्रारीवरून गोल्डी उर्फ श्रेयस दिलीप चित्री वेकर(16), दिपाली उर्फ सुषमा दिलीप चित्री वेकर(48) व सुरभी दिलीप चित्रीवेकर (22)रा. लाखांदूर आदींचे विरोधात अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करून मारण्या पिटण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी सह भादवी च्या अन्य कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

तर अन्य कुटुंबातील दिपाली दिलीप चित्रीवेकर (48) यांच्या तक्रारीवरून संगीता चिमण जगणे(35), चिमण कवडू जगणे(40), रंजना अरुण तांडेकर(35), अरुण तांडेकर(40) व कवडू जगणे(65)रा. लाखांदूर आदींचे विरोधात अश्लील शिवीगाळ बेकायदेशीर जमाव व मारण्या पिटण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सदर घटनेत दोन्ही आरोपींना बातमी लिहीपर्यंत अटक झालेली नसून लाखांदूर येथील प्रभाग 6 मध्ये तणावपूर्ण शांतता असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. या घटनेतील दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास पवनी चे उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे सह लाखांदूर ते ठाणेदार शिवाजी कदम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here