हाथरस अत्याचार प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा!

समाज क्रांती आघाडीची राष्ट्रपतींकडे मागणी.

मुर्तिजापुर – उत्तर प्रदेशात उन्नाव येथील बलात्कार, खुण प्रकरणापासुन अनेक ठिकाणी पाशवी बलात्कार व खुणाच्या घटना घडत आहेत. उन्नाव प्रकरणात तर आरोपी हा भाजपाचा आमदार होता तर नुकतेच घडलेले हाथरस प्रकरणात पोलिसांनी सुरवातीला पिडीत मुलीचा रिपोर्ट घेतला नव्हता.

तर बलात्कार करुन निर्घृनपणे खुण करणार्‍या आरोपींना बलात्काराच्या गुन्ह्यातुन वाचविण्यासाठी पिडीतेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता स्वता अंत्यसंस्कार केला. गुंडागर्दी, बलात्कारी लोकांवर पोलिसांचा धाक राहीला नाही.

राज्यघटनेनी बहाल केलेल्या मुलभुत जीवन जगण्याच्या हक्काचे उत्तर प्रदेश सरकार संरक्षण करण्यास असमर्थ ठरले आहे. अन्यायाविरुद्ध आंदोलन करणार्‍यांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार घ्यावा लागत आहे. उत्तर प्रदेशात राज्यघटनेनी निर्माण केलेल्या लोकशाहीचा दिवसा ढवळ्या खुण होत आहे.

अशा घटना विरोधी सरकारला घटनेच्या अनुच्छेद 356 अन्वये बरखास्त करावे अशी मागणी समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांनी एका शिष्टमंडळाद्वारे राष्ट्रपती भारत सरकार यांचे कडे पोलिस ठानेदार, मुर्तिजापुर यांचे मार्फत केली आहे.

शिष्टमंडळात प्रामुख्याने समाज क्रांती आघाडीच्या महीला संघटीका छायाताई खैरे, विमलताई मोटघरे, रजनीताई गवई, नलुताई मोहोड, सुषमा आरे, रमाबाई नाईक, लक्ष्मी इंगळे, अशोक वर्घट, डिगांबर आरे, नागसेन गवई, संविधान वानखडे, निरंजन जवंजाळ, भाउराव वानखडे, बळीराम वानखडे, संजय इंगळे इत्यांदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here