पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला डिसलाईकांचा पाऊस…

न्यूज डेस्क – देशात अधिक लोकप्रिय असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” कार्यक्रम काल रविवारी प्रसारित झाला मात्र हा कार्यक्रम सर्वाधित भारतीयांनी नापसंद केला असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी हे आकाशवाणीवरून हा संवाद साधतात. हा कार्यक्रम यू ट्यूबरही प्रसारित केला जातो. यावेळी मन की बातच्या यू ट्यूबवरील व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक करण्यात आल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा व्हिडीओ मोदी यांच्या नावे असलेल्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यावेळी हे सत्य असल्याचंच दिसून आलं.

भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत पेजवर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर २३ तासांमध्ये ३६ हजार जणांनी लाईक केला आहे. मात्र, डिसलाईक करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं. तब्बल ३ लाख ८ हजार जणांनी व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत डिसलाईक केलं आहे

‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, “जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा खूप कमी आहे. तो वाढवण्याची गरज आहे. नवउद्यमींनी एकत्र येऊन खेळणी तयार करावीत. स्थानिक खेळण्यांसाठी आग्रह धरण्याची हीच वेळ आहे. तरुण उद्योजकांनी मुलांसाठी भारतात संगणकाधारित खेळही तयार करावेत. ते खेळ भारतीय संकल्पनांवर आधारित असावेत,” असं मोदींनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here