दिशा पाटनीने शेअर केले “राधे” चित्रपटाचे BTS व्हिडिओ…सोबतच केला सलमान खानच्या सीनचा खुलासा…

न्यूज डेस्क – बॉलिवूडचा “दबंग” सलमान खानने एकदा कमिटमेंट केली तर नक्कीच ती पूर्ण करतो. आपला आगामी चित्रपट राधेच्या प्रदर्शनासंदर्भात सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केले कि, त्याने केलेल्या आश्वासनानुसार ईदच्या दिवशी चाहत्यांसाठी “राधे” चित्रपट घेऊन येत आहे.

नुकताच अभिनेत्याच्या ‘सीटी मार’ चित्रपटाचे पहिले गाणे प्रसिद्ध झाले आहे. जे चाहत्यांना खूप आवडले आहेत. अलीकडेच सीटी मारा या गाण्याचे बीटीएस व्हिडिओ समोर आला होते, त्यात गाण्याचे शूटिंग करताना संपूर्ण टीमने किती मेहनत केले आहे ये पाहिले होते, तर आता संपूर्ण चित्रपटाचा बीटीएस व्हिडिओही सोमोर आला असून तो व्हायरलही होत आहे.

हा व्हिडिओ दिशा पाटनी यांनी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट केला आहे, जो सामायिक केल्यापासून 1 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण चित्रपट भिन्न भिन्न प्रकारे शूट केले आहे. गाण्याच्या शुटिंगसह अ‍ॅक्शन सीन व्यतिरिक्त आणि चित्रपटाचा संपूर्ण क्रू मेंबर त्यांच्या कामाचा आनंद घेत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहु शकता की सलमान त्याच्या को-स्टार दिशा आणि रणदीप हूडासोबत चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करताना किती मजा – मस्ती करत आहे.

त्याचबरोबर या चित्रपटाशी संबंधित लोकांनीही आपले अनुभव या व्हिडिओद्वारे शेअर केले आहेत, यावेळी सलमान खान स्वत: बद्दल आणि दिशाच्या एज गॅपवर थट्टा करत असतानाच दिशाच्या कामाचे कौतुक करतानाही दिसतो. सलमान असे म्हणताना दिसतो – “दिशाने चित्रपटात एक अद्भुत काम केले आहे. या चित्रपटात खूपच सुंदर दिसत आहे. आम्ही दोघेही एककाच वयचे दिसत आहो.” यासोबतच सलमाननेही या सिनेमातील त्याच्या किसिंग सीनबद्दल बोलताना हे सस्पेन्स उघड केले. सलमान किसिंग सीनबद्दल म्हणतो की- “ या चित्रपटातील किसिंग सीन दाखवणे ये आवश्यक होते आणि ये सीन मधे कीस टेपवर केले आहे”

सलमान खानच्या ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटाला चाहत्यांचा चांगला सपोर्ट मिळत आहे, यापूर्वीचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक चित्रपटाची दोन गाणीही रिलीज झाली असून या सर्वांना बरीच पसंती मिळत आहे म्हणजे, ईदच्या निमित्ताने हा संपूर्ण चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच वेळी, कोरोनाचा कहर पाहून हा चित्रपट थिएटर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म Zee 5 वर प्रदर्शित होत आहे जेणेकरून लोक घरी बसून देखील चित्रपट पाहू शकतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here