पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा…

न्यूज डेस्क – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या या भेटीचे बरेच अर्थ पावसाळी अधिवेशनापूर्वी काढले जात आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. यानंतर, 16 जुलै रोजी शरद पवार यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयात शनिवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे बैठक झाली असून या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here