मोठी बातमी| दिल्लीत पेट्रोल पेक्षा डीझेल महाग…सलग १८ व्या दिवशी दरवाढ सुरूच…

डेस्क न्यूज – राजधानी दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या किंमतीपेक्षा डिझेलच्या किंमत जास्त झाली आहे.आज बुधवारी सलग १८ व्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली.

दिल्लीत पेट्रोलची किंमत बुधवारी प्रति लिटर ७९.७६ वर स्थिर राहिली, परंतु डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४८ पैशांची वाढ झाली.

वृत्तसंस्था एएनआय च्या म्हणण्यानुसार, बुधवारी डिझेलमधील ही वाढ प्रति लिटर ७९.८८ रुपये दराने झाली आहे. अशाप्रकारे, दिल्लीतील ग्राहकांसाठी पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे.

बुधवारी देशातील इतर महानगरांमध्ये डिझेलचे दर वाढले आहेत. डिझेलची किंमत फक्त दिल्लीत पेट्रोलपेक्षा जास्त आहे. बुधवारी मुंबईत पेट्रोल ८६.५४ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे आणि डिझेलच्या वाढीसह ७८.२२ रुपये दराने.

कोलकाताबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी पेट्रोलची किंमत ८१.४५ रुपये प्रति लिटरवर आणि डिझेलच्या वाढीसह ७७.०६ रुपये प्रतिलिटर दराने विकली जात आहे. चेन्नईमध्येही पेट्रोल ८३.०४ रुपये प्रतिलिटर आणि डिझेल प्रतिलिटर ७७.१७ रुपयांवर पोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here