अमरावती | धारणीत अग्नितांडव…बाजारपेठेला लागलेल्या भीषण आगीत १५ दुकाने जळून खाक…

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील बस स्थानक लगत असलेल्या मुख्य रस्त्यावरील बाजार पेठेला आज सकाळी चार वाजताच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे दहापेक्षा जास्त दुकाने आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

आगीत जुळून खाक झालेल्या दुकानामध्ये चार मोठ्या कपड्यांच्या दुकानांचा समावेश असल्याने लाखो रुपयांचे नुकसान या आगीमुळे झाले आहे. आगीची माहिती मिळताच धारणी नगरपंचायतीच्या अग्निशामक बंब घटनास्थळी पोहचुन आग आटोक्यात आणली आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातील एसटी बस स्टँड परिसरात असणाऱ्या बाजार पेठेतील एका हॉटेलला आज पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे या दुकानाच्या रांगेत असलेल्या इतरही दुकांन या आगीत पेटले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.

या आगीत बाजारपेठेत  मध्ये असलेले चार मोठे कपडा दुकाम,चप्पल दुकाम ,हॉटेल आदी दुकाने आगीत भस्मसात झाले आहे .नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप पुढे आले नाही आहे.एन दिवाळीच्या हंगामात दुकानाला लागलेल्या आगी मुळे व्यावसायिक मोठे संकटात सापडले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here