दर्यापूर येथील धनलक्ष्मी व महालक्ष्मी व्हिडीओ पार्लर, पोलिसांची धडक कारवाई…

२ लाख ८ हजाराचा मुद्देमालासह :-७ सात आरोपी वर गुन्हा दाखल

दर्यापूर – किरण होले

आज दिनांक ५/३/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण व पो.स्टे दर्यापुर येथील पथक अवैध धंदयाविरुध्द कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करित असतांना पोलीस स्टेशन दर्यापुर अंतर्गत आठवडी बाजार येथे मोठया प्रमाणात अवैध रित्या जॅकपॉट लॉटरी चा व्यवसाय सुरू असल्याचे गुप्त माहीती वरून सदर पथकाने धनलक्ष्मी व महालक्ष्मी व्हिडीओ पार्लर आठवडी बाजार,

दर्यापुर येथे धाड टाकून पाहणी केली असता, सदर ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मशीन वर अवैध रित्या जॅकपॉट लॉटरीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसुन आले. वरून स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणचे व पो.स्टे दर्यापुर येथील पथकाने धनलक्ष्मी व महालक्ष्मी लॉटरी सेंटरमध्ये लॉटरी खेळनारे

१) विजय रामराव बारब्दे, वय ५१ वर्ष रा. दर्यापुर २) सुरेश जनार्धन तराळ बय ५० वर्ष रा दर्यापुर ३) गोकुल हरिभाऊ गावंडे वय ५१ वर्ष रा. हिंगणी मिझापुर ४) निलेश लक्ष्मण ईसोकार वय ३२ वर्ष रा. बनोसा ५) संतोष गणेश आढे वय ३५ वर्ष रा. बनोसा ६) शैलेश लक्ष्मण इंगळे वय ३० वर्ष रा. बनोसा ७) सदानंद गुलाबराव तळोकार वय ५० वर्ष रा. बनोसा यांना ताब्यात घेण्यात आले.

सदर लॉटरी सेंटर मधून २८ नग ईलेक्ट्रॉनिक मशिन, पितळी कॉईन व नगदी १२,८००/रुपये असा एकुण २,०८,८००/- चा मुद्देमाल जप्त करून सर्व ईसमांना पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन दर्यापुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.हरि बालाजी एन,अपर पोलीस अधिक्षक श्री.श्याम घुगे, यांचे मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक,

श्री.तपन कोल्हे ठाणेदार पो.नि.प्रमेश आत्राम पोलीस स्टेशन दर्यापुर यांचे नेतृत्वात पो.उप.नि.आशिष चौधरी, पोउपनि प्रिया उमाळे,स.पो.उप.नि.संतोष मुंदाने, नापोका रविंद्र बावणे, पुरूषोत्तम यादव, प्रशांत ढोके, बजरंग इगळे, मंगेश अगळते, पोकॉ दिनेश कनोजीया, पंकज फाटे, सागर नाथे, शरद सारसे यांनी केली आहे.`

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here