हिमाचलच्या धर्मशाळा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी…

फोटो Twitter

हिमाचलच्या धर्मशाळा आणि जम्मू-काश्मीरच्या गांदरबल भागात ढगफुटीमुळे जबरदस्त नुकसान झाल्याची माहिती आहे. ढगफुटीमुळे येथे पूर आला असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे महामार्गही येथे ठप्प झाला आहे.

जम्मू-काश्मीरमधील गांदरबालशिवाय शेजारच्या हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या धर्मशाळेत ढगफुटी झाली आहे. येथे ढगफुटीमुळे बरेच नुकसान झाले आहे आणि बरीच पर्यटक वाहने पाण्याने वाहून गेली आहेत. हवामान खात्याने उत्तर भारतातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, तर किनारी महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

धर्मशाळेच्या भागसु नागात ढग फुटला
उन्हापासून आराम मिळण्यासाठी पर्यटक धर्मशाळेच्या भाग्सु नागकडे वळत आहेत आणि रात्री उशिरापासून पाऊस अचानक वाढला. या पूरात अनेक कार वाहून गेल्या आहेत. पर्वतात ढगफुटीमुळे हा पूर आला असा संशय आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे नदी नालेही तुडुंब भरून वाहत आहे. अशा परिस्थितीत नद्यांनी, नाल्यांमध्ये जाऊन जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

जम्मूमध्ये पहिल्याच पावसाने जोरदार एन्ट्री मारल्याने अनेक भाग जलमय झाले
गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. नदी नाले तुडुंब वाहत आहे. पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने प्रशासनाच्या पोकळ दाव्यांचा पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत कुठल्याही ठिकाणाहून जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु या पावसामुळे जम्मू विभागात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

शिमल्यात मुसळधार पाऊस
शिमला येथील रामपूर येथील ब्रॉनी नाला झाक्री येथे मुसळधार पावसामुळे एन-एच 05 बंद झाला आहे. रस्त्यावर मातीचा ढीग आहे. शिमला येथे मुसळधार पाऊस पडत आहे, त्यानंतर हवामान खात्याने ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here