विविध मागण्यांसाठी अभाविपचा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर धडक मोर्चा…

औरंगाबाद – विजय हिवराळे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

धुळे येथे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गोधंळनिर्माण करणाऱ्या शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या राजीनामाची मागणी सुध्दा यावेळी करण्यात आली.त्यावेळी विद्यार्थ्यांच्या खालील मागण्या करण्यात आल्या.

१) ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे.
२) नवीन वर्ष 2020 21 साठी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क 30 टक्के कमी करावे.
३) विद्यार्थ्यांना प्रवेश देताना दहा टक्के शुल्क घेऊन प्रवेश द्यावा व उरलेले शुल्क भरण्यासाठी चार टप्प्याची मुभा देण्यात यावी.
४) विद्यापीठ व विद्यापीठ उपपरिसरात ताबडतोब विद्यार्थी तक्रार निवारण केंद्र सुरू करावे.

मागण्याच निवेदन प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांना देण्यात आले.
विद्यापीठाने मागण्या संदर्भात लेखी उत्तर दिले आहे.
या वेळी अभाविपचे प्रदेशमंत्री स्वनिल बेगडे तसेच प्रदेश सहमंत्री अंकिता पवार, महानगरमंत्री तुषार साळुंखे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here