कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या धर्तीवर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी…देवेन्द्रजी फडणवीस…

वडसा तालुक्यातील सावंगी, आमगाव परिसर व वडसा शहरातील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

उध्दव ठाकरे यांनी स्वतः बोलल्या प्रमाणे हेक्टरी २५ ते ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी.

गडचिरोली – मिलींद खोंड

मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या काळात जनतेला मदत मिळावी याकरिता आपल्या भाजपा सरकारने ज्याप्रमाणे ६ जी आर काढून शेतकरी ,गावकरी गरीब यांना भरीव मदत केली त्याच आधारावर विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांनी राज्य सरकाकडे केली आहे.

ते आज गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी,आमगाव व वडसा शहरातील पूरग्रस्त भागातील नष्ट झालेल्या पिकांची ,पडझड झालेल्या घरांची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेला संबोधित करीत होते.गडचिरोली जिल्ह्यातील पूरपरिस्थतीमुळे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष द्यावे व आर्थिक मदत करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे.

त्याचप्रमाणे मागील वर्षी आताचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले असता नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी केली होती.

आता तेच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी आता आपले शब्द पाळावे व हेक्टरी २५ हजार व ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशीही मागणी केली यावेळी त्यांनी जनतेच्या समस्यांचे निवेदनही स्वीकारले यावेळी राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा. श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपचे विदर्भ संघटन प्रमुख मा.डॉ श्री उपेंद्रजी कोठेकर, माजी राज्यमंत्री मा परिणयजी फुके,

गडचिरोली- चिमूर लोकसभेचे खासदार अशोकजी नेते,जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आम. डॉ देवरावजी होळी ,आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णाजी गजबे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव जी कोहळे,जिल्हा महामंत्री रविन्द्र ओल्लारवार,

प्रशांत वाघरे,प्रमोदजी पिपरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, जिल्हा परिषदेच्या सभापती रंजीता ताई कोडापे जिल्हा परिषदेचे सदस्य नाना नाकाडे तालुका अध्यक्ष राजुभाऊ जेठाणी यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here