ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यरात्री पोहचले पोलीस ठाण्यात…

न्यूज डेस्क – राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर कोरोनावर उपचारासाठी देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा राज्यात जाणवत असून अनेक ठिकाणी या इंजेक्शन चा काळाबाजार होत असल्याचे निर्दर्षानास आले आहे.

यादरम्यान रेमडेसिवीरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर विले पार्ले पोलिसांनी ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. या कारवाईची माहिती मिळताच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांनी कारवाईबद्दल जाब विचारत खरडपट्टी काढली.

पोलीस ठाण्यात वाद झाल्यानंतर तेथील अधिकारी आणि भाजपा नेते बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी ब्रुक फार्माविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यानंतर अखेर ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलं. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि कारवाई केली जाते असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सौजन्य – प्रतीकजी करपे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here