थीलोरी येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन, आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते संपन्न…

दर्यापूर – किरण होले

दर्यापुर तालुक्यातील अकरा सदस्य असणारी मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थीलोरी ग्रामपंचायत मध्ये अकरा ही यावर्षी नवीन सदस्यांची गावकऱ्यांनी निवड करून दिली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पाच वर्षांमध्ये संपूर्ण गावाचा चांगल्या प्रकारे विकास व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही एक पाऊल उचलले आहे असे मत समता परिवर्तन पॅनल चे विजयाचे शिल्पकार शशांक धर्माळे यांनी सांगितले आहे.

त्यातच सरपंच उपसरपंच सदस्यांनी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळला असून गावातील विविध विकास कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे. आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीमध्ये थीलोरी येथील नाल्याचे खोलीकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँक्रिटीकरण,

रस्त्याचे बांधकाम असे एकूण 13 लाख रुपयांचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार योगेश देशमुख, सरपंच सौ. मीना शशांक धर्माळे , उपसरपंच गौतम वाकपंजर, सर्व सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here