उद्योजकता विकसित झाली पाहिजे…नितीन गडकरी यांचे प्रतिपादन…डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण…

नागपूर – शरद नागदेवे

फोटो ३८९५ नावाने. यशस्वी उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज यांना पुरस्कार प्रदान करताना नितीन गडकरी. सोबत गिरीश गांधी, रामदास आठवले, अजय पाटील व इतर मान्यवर) नागपूर, १६ ऑक्टोबर आपल्याला जीवनात काय करायचे आहे हे प्रत्येकाने ठरविणे गरजेचे आहे. आज प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक जण चांगली नोकरी कोणत्या क्षेत्रात मिळेल याचा शोध घेऊन ती नोकरीच करतात.

परंतु नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होणे गरजेचे आहे. उद्योजक बनायचे आहे, याबाबत मोजकेच लोक विचार करतात. ध्येय निश्चित केले तर यश मिळते. कल्पना सरोज यांच्यासारखे उद्योजक तयार झाले तर दीडपट उद्योग वाढतील. त्यामुळे उद्योजकता विकसित झाली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वनराई फाऊंडेशनच्या वतीने यशस्वी उद्योजिका कमानी ट्युब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांना श्री साई सभागृहात आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले होते. व्यासपीठावर वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, उद्योजकतेचा संबंध हा कुठल्याही जाती, धर्म, पंथाशी नाही. तंत्रज्ञानाच्या आधारे आपण अनेक वस्तूंची निर्मिती करू शकतो. शेतकèयांच्या उत्पादनापासून इथेनॉलची निर्मिती करून शेतकèयांचे जीवनमान उंचाविण्याचा मानस आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातून ३०० कोटी रुपये मनपाने कमविले आहे. मिहानमध्ये सुमारे ५६ हजार लोकांना काम मिळाले आहे.

त्यामुळे तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. जे खरेच चांगले काम करीत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असून वनराई त्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील शोषित, पीडित शंभर तरुण-तरुणींना उद्योजक बनवा, असा सल्ला नितीन गडकरी यांनी यावेळी सत्कारमूर्ती कल्पना सरोज यांना दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.

माझ्या जीवनात डॉ. आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारमार्गांचा वाटा खूप मोठा आहे. मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु हा पुरस्कार माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असे मत सत्काराला उत्तर देताना कल्पना सरोज यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी, तर आभारप्रदर्शन वनराई फाउंडेशन चे अजय पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here