देऊळगाव मही प्रेमीयर लिंक DMPL क्रिकेट स्पर्धा आजपासून…

देऊळगाव मही – देवा पाटील मित्र मंडळातर्फे आयोजित देऊळगाव मही प्रेमीयर लिंक DMPL करंडक एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेला सोशल distashing आणि सर्व नियमाचे पालन करून शुक्रवार आज पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेचे यंदाचे १६ वे वर्ष आहे.

जिजामाता क्रीडा संकुलावर ही स्पर्धा होणार आहे. समाधान शिंगणे जिल्हाकार्य अध्यक्ष रा,वा,यु कॉ,यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी 10 वाजता क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी त्यांनी खिळाडू यांना सभोदीत करतेवेळी,

ग्रामीण भागातील गुणवान आणि क्षमता असलेल्या खिळाडूनां अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत संधी मिळावी या मुख्य हेतुने DMPL चे आयोजन केलेलें आहे या स्पर्धेमुळे क्रिकेट खेळालाही चलना मिळेल आणि त्यातूनच होतकरू खिळाडू नावारूपाला येतील अशी अश्या रा,वा, यु,काँग्रेस जिल्हाकार्य अध्यक्ष समाधान शिंगणे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती पती गजानन शिंगणे, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी राजे शिंगणे,अशोक पाबळे, शंकर दादा शिंगणे,रामा म्हस्के,वसुदेव शिंगणे,कलिंम शेठ, सय्यद सहीद, अनिल शिंगणे,किशोर शिंगणे,प्रशांत शिंगणे, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देवा पाटील शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी,रंगा शिंगणे,अनिरुद्ध शिंगणे,शेख रमीज,शेख रईस, सचिन नागरे,दीपक शिंगणे,मुन्ना सोनसळे,समाधान पवार,अतुल शिंगणे,रवी पवार,सचिन शिंगणे,राहुल गायकवाड आधींनी पुढाकार घेतला आहे ,प्रथम विजेत्यास 21हजार तर उपविजेत्यास14हजारांचे बक्षिसं देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग घेतला आहे. या संघांची 3 गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेतील सामने प्रारंभी साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहेत. आयसीसीच्या च्या नियनानूसार सामने होतील. या स्पर्धेत शहानुर स्टार, छत्रपती वारीयर्स,मोरया वारियर्स,दबंग फायटर्स,DSK, MAHI 11 अशा संघांचा स्पर्धेत सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here