यवतमाळ : अवैध रेती वाहतुकीवर आळा घालण्यास गेलेले उमरखेड़ चे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर काल रात्री 11 च्या सुमारास उमरखेड़ ते ढाणकी रोडवर रेती तस्करांकडून हल्ला करण्यात आला. यात वैभव पवार यांच्या पोटात चाक़ूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहे.
त्यांच्यावर तत्काल उमरखेड़ येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारकरिता त्यांना नांदेड येथे पाठवण्यात आले आहे.
या घटनेची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी घेतली असून आरोपी अविनाश चव्हाण व त्यांच्या इतर साथीदारांवर कडक कलम लावून तत्काल कारवाई करण्याचे आदेश SDPO SDO यांना दिले आहे.
तसेच नायब तहसीलदार आणि तलाठी यांची प्रकृती चांगली असून त्यांना जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण मदत केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.