चिखली – भारतातच नव्हे तर जगात थैमान घातलेल्या covid-19 या लसीचा शुभारंभ झाला आणि प्रत्येकाला उत्सुकता लागून राहिली की आपल्या गावचा नंबर केव्हा लागेल व कधी लागेल व्हाट्सअप व विविध माध्यमावर सांगितले गेलेले उडवाउडवीची उत्तरे तर कधी लोकडाऊन तर कधी रात्रीचा जनता कर्फ्यू या त्रासाला कंटाळलेल्या जनतेला आता एक लसीच्या रूपाने दिलासा मिळालेला आहे.
चिखली पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ग्राम गोदरी येथे आज दिनांक 8 एप्रिल रोजी लसीकरणाच्या शिबिराची फित कापून उपसरपंच भरत जोगदंडे यांचा हातसे लसीकरणाची सुरुवात करण्यात आली वयाच्या 45 ते 60 वर्षांपर्यंत असणाऱ्या गावातील सर्व लोकांना या लसीचा लाभ घेता येणार आहे व आपण याचा लाभ घेवा या दुर्धर आजाराने देशच नव्हे तर परिसरातील जनता त्रस्त होत आहे.

याचं लस टोचणे चा शुभारंभ करुन आपण या परिस्थितीला आटोक्यात आणण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत असे यावेळी बोलतांना भरत जोगदंडे यांनी सांगितले गोरगरिबांच्या समस्यांची जाण आम्हला आहे व ग्रामपंचायत च्या पुढाकाराने सदर परिस्थितीचा हा पूर्णत्वास जाईल खरे परंतु याची योग्य नियोजन करणेही तितकेच महत्वाचे असे भरत जोगदंडे म्हणत होते.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच पुत्र प्रभु दहिकार,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आशोक सुरडकर,विठ्ठल परिहार,दिपक सुरडकर,संतोष कोथळकर वैद्यकीय अधिकारी डॉ पांढरे सर यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित कर्मचारी डॉ. महाजन मॅडम,डॉ पाटील मॅडम (समुदाय आरोग्य अधिकारी ) श्री विजय जाधव ,

श्री सतिश इंगळे ( आरोग्य पर्यवेक्षक ) श्री व्ही ए वायाळ (आ .सेवक ) श्रीमती मघाडे , श्रीमती उबरहंडे ( आ सेविका द्रोपती पवार अंगणवाडी सेविका अलका परिहार,मंदा साळवे,नलूबाई लोखंडे,संगीत कुठे,पोलिस पाटील राहुल साळवे,तलाठी हर्षवर्धन देशमुख,ग्रामसेवक बि के परिहार,मुख्यध्यापाक वाघमारे सर,वाघ सर, गाडेकर सर,सोळंकी सर,ग्रा.शिपाई विठ्ठल वैष्णव,परसराम परिहार,कॉम्प्युटर ऑपरेटर ज्ञानेश्वर बकाल तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते