राष्ट्रपती पुरस्काराची ती बातमी जुनी- विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलीस उप महानिरीक्षक पदावर कार्यरत असलेले लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र आयपीएस निसार तांबोळी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला असल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अनेकांनी आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

परंतु ही बातमी जुनी असून मला तीन वर्षांपूर्वीच राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सदरील बातमी ही जुनी असल्याने ही बातमी कुणीही सोशल मीडियाद्वारे प्रसारीत करू नये असे आवाहन त्यांनी जनतेस केले आहे.

आयपीएस निसार तांबोळी हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले लातूर जिल्ह्यातील अधिकारी आहेत.आजपर्यंत त्यांनी अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत, हिंगोली, नांदेड, वर्धा, नंदुरबार, अमरावती, नाशिक, मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.

2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते,2008 ते 2009 एअरपोर्ट झोन,2015 ते 2017 औरंगाबाद येथे सीआरपीएफ मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.त्यांना यापूर्वी सीआरपीएफ औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबोळी यांना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना आवडते, स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे,

मुंबई क्राईम ब्रँच साठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले होते ,जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची तयारी आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन 3 वर्षांपूर्वीच त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

परंतु ही जुनी बातमी सोशल मीडियावर नव्याने मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून फेसबुक, व्हाट्सअप, विविध न्युज पोर्टलवर व कांही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांचे सोशल मीडियावर मॅसेजद्वारे व शुभेच्छा पोस्ट टाकून अभिनंदन केले आहे. या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने निसार तांबोळी यांना विचारणा केली असता ही बातमी जुनी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here