दर्यापूर येथील महावितरण कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता यांना जीवे मारण्याची धमकी…

आरोपी विरुद्ध दर्यापूर पोलीस स्टेशनचे गुन्हा दाखल…

दर्यापूर – किरण होले

गेल्या पंधरा महिन्यापासून दर्यापूर तालुक्यात काही व्यक्तींकडे विद्युत पुरवठा बिल थकीत आहे. त्या बिलाचा भरणा करण्यासाठी महावितरण कार्यालयातून नागरिकांना वारंवार सूचना देण्यात आली आहे. परंतु नागरिकांकडून अद्यापही वीज बिल भरणे झालेले नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महावितरण कार्यातील कर्मचाऱ्यांनी पथक नेमून वीज आकारणी सुरू केली आहे.

परंतु दर्यापूर येथील संबंधित व्यक्ती पंकज साहेबराव दुधंडे यांचे दर्यापूर ते अंजनगाव मार्गावरील प्रायव्हेट आर्मी एकेडमी कॅम्प असून त्यांच्याकडे मागील 18 मार्च 2020 पासून एकूण पंधरा हजार रुपये विद्युत पुरवठा बिल खंडित आहे . संबंधित व्यक्तीला महावितरण कार्यालयातून वारंवार सूचना देण्यात आले आहे. मात्र आज पर्यंत एक रुपया सुद्धा वीज बिलाचा भरणा करण्यात आलेला नाही.

त्यामुळे आज सोमवार रोजी महावितरण कार्यालयाची अभियंता सोपान गायधने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह आर्मी कॅम्प येथे भेट दिली विज बिल भरणा करण्यासाठी संबंधित व्यक्तीला विनंती केली परंतु संबंधित व्यक्तीने अधिकाऱ्यांची कुठलीही ऐकून न घेता अधिकाऱ्यांनाच उद्धट भाषेत उत्तर दिले. व जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर संबंधित अधिकारी आपल्या कार्यालयात हजर झाले.

असता पंकज साहेबराव दुधंडे हे आपल्या चार ते पाच कर्मचाऱ्यांसह सोबत येऊन त्यांनी दर्यापूर येथील उपकार्यकारी अभियंता येथील सहाय्यक अभियंता सोपान गायधने यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत आरोपी पंकज साहेबराव दुधंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार एक वर्षांपासून खंडित असलेले बिल पुरवठा बिल वसूल करण्यासाठी आम्हाला खडका देश आहे आदेशानुसार आम्ही सर्व ग्राहकांकडून विज बिल वसूल करत आहे परंतु. दर्यापूर अंजनगाव मार्गावरील प्रायव्हेट आर्मी अकॅडमी येथे वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेले असता संबंधित कर्मचारी यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली . सदर व्यक्ती विरूद्ध दर्यापूर पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली आहे.

सोपान गायधने
सहाय्यक अभियंता दर्यापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here