पूर्वसूचनेविना उपसंचालकांनी अभयारण्य उपहारगृहाची निविदा रद्द करीत, मजुरांना रात्रीच उपहारगृहातुन काढले बाहेर…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्हातील गोरेगाव तालुक्यातील चिचगावटोला येथील रहिवासी मंगलदीप भावे 1 आक्टोबर पासून पिटेझरी प्रवेशद्वार येथे उपहारगृह चालविण्यासाठी मिळालेल्या निविदेनुसार उपहारगृह चालवित आहेत. परंतु अचानक 30 नोव्हेंबर ला डि.एम. नितीनकुमार सिंह यांनी निविदा रद्द करण्यात आल्याचे मोबाईल फोन व्दारे सांगितले.

या संदर्भात उपसंचालक पुनम पाटे यांनी निविदा रद्द करण्यात आल्याची पुर्वसुचना मंगलदिप भावे यांना देण्यात आलीच नाही परंतु उपहारगृहातील मजुरासह मंगलदिप भावे यांच्या भावास रात्रीच उपहारगृहाच्या बाहेर काढले असे आरोप मंगलदिप भावे यांनी केले असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, क्षेत्रसंचालक यांना न्यायासाठी 3 नोव्हेबरला तक्रार दाखल केली आहे.

मंगलदिप यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,30नोव्हेबरच्या रात्री साडेअकरा वाजता वनपरिक्षेत्राधिकारी वि. एम. भोसले यांनी उपहारगृहातील कँटीन मध्ये येऊन सांगितले की, उपसंचालक पुनम पाटे यांच्या आदेशानुसार या उपहारगृहाची निविदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उपहारगृहातुन तत्काळ निघावे असे सांगितले व 30नोव्हेंबरच्या रात्रीच कँटीन चे बाहेर खुल्या जंगलात काढले. व बळजबरीने भोसले यांनी पंचनामा लिहून घेतले आहे.

उपहारगृहाचे व्यवस्थापक अमित लोखंडे यांना मासिक भाडे 75,500 रुपये जमा करूनसुद्धा कँटीन ची निविदा रद्द का? करण्यात आली. यासंदर्भात माहीती देण्यात आली नाही.व जातीवाचक शिविगाळ करण्यात आली. विनासुचना एका दिवसात नवीन कँटीन धारकास उपहारगृहाचे वर्क ऑर्डर दिले.

या प्रकरणामुळे मानसिक त्रास झाला असून बेरोजगार झाले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. सदर अधिकाऱ्याची योग्य चौकशी करुन मला न्याय देण्यात यावे असी मागणी मंगलदिप भावे यांनी वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया आर. एम. रामाणूजम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचेकडे केली आहे.यावर आता काय अधिकारी कारवाई करतील याकडे विशेष लक्ष राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here