उपजिल्हाधिकाऱ्यांची अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी…!

न्युज डेस्क – यंदा कोरोनाच्या संकटातून नागरीक सावरत असताना घरा-घरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. मात्र, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करुन त्यांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविलाय. अर्थात या अनाथांना नात्याचा एक आनंद करून दिलाय.

अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात अनाथ मुलाचं आनंद आश्रम आहे. या आश्रामात तब्बल १४ मुली असून त्यांना काल दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या फराळासह दहा दिवस पुरेल इतके रेशन दिलेय. त्यानंतर सर्वांच्या समवेत फटाके फोडून मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमलवले. यावेळी संजय खडसे व त्यांच्या पत्नीसह मुले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here