विरार शिवसेना उप शहर प्रमुख श्री.ऊदय (दादा) जाधव यांनी दिला पूरग्रस्तांना आधार…

मुंबई – धीरज घोलप

विरारचा विघ्नहर्ता म्हणुन ओळखला जाणारा शिवसेना पुरस्कृत गरूड झेप मित्र मंडळाच्यावतीने चिपळुण व महाड पुरग्रस्तांना मदत देण्यासाठी व त्यांच्या संकटकाळी सेवा करण्यासाठी अध्यक्ष श्री. उदय अ.जाधव तसेच शिवसेना उपशहरप्रमुख श्री.आनंद चोरघे, विभागप्रमुख श्री.जितेंद्र खाड्ये, उपविभागप्रमुख श्री.संतोष राणे, शाखाप्रमुख श्री.तुकाराम भुवड, श्री.संजय चव्हाण,

श्री. प्रदिप मोरे यांनी चिपळुण येथे स्व:ता घरोघरी जाऊन तसेच गावक-यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच विरार शहरातील नागरिकांच्या व मंडळाच्या सहाय्याने जमा करण्यात आलेले धान्याचे किट, चादर, ब्लेंकेट, चटई, कपडे,

बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या आदि वस्तु स्वरूपात मदत म्हणुन देण्यात आली तसेच रोगराई पसरू नये म्हणुन शिवसैनिकांच्या सहाय्याने गाव-गावात जाऊन औषध फवारणी करून घेतली.ही सेवा पार पाडण्यासाठी शिवसैनिक श्री.अनिल पाटील, श्री.सचिन पाटील,

श्री.चंद्रकांत सावंत, श्री.गणेश जाधव, श्री.रोहित कदम, श्री.अशोक माने, श्री.प्रदिप लाड, श्री.दुर्वेश देसाई, श्री.प्रदिप राजपुत, श्री.प्रकाश यादव, श्री.सागर नाचरे, श्री.राजेंद्र गावडे, श्री.प्रदिप कदम, श्री.प्रयाग मांजरेकर, श्री.अजय धाडवे, श्री.मयुरेश परब, आदि शिवसेना व मंडळाचे पदाधिकारी व युवासैनिकांनी विशेष परिश्रम घेतले.

विरार शहरातील नागरीकांनी व मंडळातील सदस्यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यास खुप सहकार्य केले..शिवसेना उप शहर प्रमुख श्री.ऊदय (दादा) जाधव याच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here