कलावंतांच्या हितासाठी सदैव तत्पर – उपमुख्यमंत्री अजित पवार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागात अभिनेत्री सुरेखा कुडची, अभिनेते संभाजी तांगडे, गीतकार-लेखक बाबासाहेब सौदागर यांनी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.यावेळी अभिनेत्री सुरेखा कुडची यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी, अभिनेते संभाजी तांगडे यांची मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी आणि गीतकार लेखक बाबासाहेब सौदागर यांची खान्देश विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाला जवळ जवळ दीड तास वेळ दिली, या वेळी अनेक महाराष्ट्रातील कलाकारांच्या बाबतीतील खूप महत्वपूर्ण निर्णय आज दादांनी आमच्या निवेदनावर घेतले व लवकरच येत्या महिन्याभरात प्रामुख्याने मराठी चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत, सिडको आणि म्हाडामध्ये कलाकारांना आरक्षित घरे मिळण्याबाबत,

वृद्ध कलावंतांना पेन्शन मध्ये वाढ मिळावी ,तमाशा फड मालकांना बंद झालेले अनुदान लवकरच चालू करणे बाबत, मराठी चित्रपटांना अनुदान लवकरात लवकर सुरू होण्याबाबत, नाट्यगृह, टुरिंग टॉकीज ,सिनेमा गृह लवकरात लवकर सुरू करण्याबाबत, स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत, अशा या मागण्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागातर्फे अजित दादांना करण्यात आल्या व त्या लवकरच पूर्ण होतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या पुढाकारानं झालेल्या या बैठकीला प्रदेश सरचिटणीस प्रशांत मानकर, शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण,

सांस्कृतिक पुणे विभागाच्या प्रमुख अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेत्री मेघा घाडगे, अभिनेते गिरीश परदेशी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, गायिका वैशाली माडे, अभिनेते डॉ. सुधीर निकम, निर्माते मंगेश मोरे, निर्माते संतोष साखरे आणि लेखक दिग्दर्शक कौस्तुभ सावरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here