वंचित बहुजन युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षांचा आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश…

पातूर – निशांत गवई

नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या दोन माजी आमदारांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली.त्यापाठोपाठ लगेच राष्ट्रवादीचे नेते राहुल डोंगरे यांनी पक्षवाढीकरिता चालविलेल्या कॅपिंगला यश येतांना दिसत असून,

त्यांनी पुढील पंचवार्षिकला होऊ घातलेल्या आगामी निवडणूका लक्षात घेता पक्षाची व्यूहरचना आतापासूनच रचण्यास सुरुवात केली असून,नविन चेहऱ्यांना पक्षात सामील करून त्यांच्या माध्यमातून पक्षवाढीकडे व मतदारात भर पाडण्याकरिता युद्धपातळीवर प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहेत.

त्याचीच पावती म्हणून आज दि.३१/८/२०२० रोजी कौलखेड अकोला येथील गुलाबराव गावंडे यांच्या आश्रमात वंचित बहुजन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर कढोणे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सागर कढोणे यांची ओबीसी समाजातील युवा नेतृत्व म्हणून जिल्हाभरात ओळख निर्माण झालेली असून समाजात मजबूत पकड असल्याने बरिच मोठी वोटबँक राष्ट्रवादीच्या पारड्यात येऊन पडली असल्याने पक्षाला याचा नक्कीच फायदा होईल.

राष्ट्रवादी नेते राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सागर कढोणे, निलेश माहुलीकर,दिनकर पाटील आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,व पक्षेनेते माजी आमदार तुकाराम बिडकर राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, श्रीकांत पिसे,बळीराम सिरस्कार,हरिदास भदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here