वंचित बहूजन आघाडी तर्फे नागपूरात आक्रोश आंदोलन…

नागपूर – शरद नागदेवे

हाथरस येथील सामूहिक अत्याचाराची घटना तसेच उत्तर प्रदेश शासनाच्या असंवैधानिक, अमानवीय कृती विरोधात दिनांक ०३ आॅक्टोंबर २०२० ला संविधान चौक नागपुर येथे वंचित बहुजन आघाडी नागपुर चे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करन्यात आले.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०२० रोजी मनिषा वाल्मीकि (वय १९ वर्षे) या वाल्मीकि समाजाच्या हिंदू मागासवर्गीय निष्पाप तरूनी चे अपहरन करून तिच्यावर सवर्ण समाजाच्या ४ नराधमांनी सामुहिक बलात्कार करून क्रुरतपापुर्वक मारहान केली, मनिषा च्या पाठीचे हाड तोडन्यात आले व जिभ कापन्यात आली. इतका पाशवी ह्रदयविदारक अमानुष अत्याचार करनाऱ्या नराधमांना तात्काल फांसी देन्यात यावी. अशी मागणी यावेळी करन्यात आली

दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी मनिषा चा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यु पश्चात पार्थिव शरीर पिडित परिवाराच्या स्वाधिन न करता उत्तर प्रदेश च्या शासन व पोलिस प्रशासनाने पिडित परिवाराची परवानगी न घेता व कोणतीही पुर्वसुचना न देता परस्पर मृत देह पेटवला.

मृत तरूनीचा अंतिम संस्कार करने हा तिच्या परिवाराचा मानवीय संविधानिक अधिकार होता, परंतु उत्तर प्रदेश शासनाने तो सम्मानपूर्वक अंतिम संस्काराचा अधिकारही हिरावून घेत पार्थिव शरिराची विटंबना केली. उत्तर प्रदेश शासनाने मानवाधिकाराचे उल्लंघन केले.

तेव्हा शासन प्रशासनातील संबंधित अधिकारी वर्गावर कठोर कार्यवाही झाली पाहिजे, तसेच भारताच्या राष्ट्रपति महोदयांनी तात्काल उत्तर प्रदेश शासन बर्खास्त करून राज्यात राष्ट्रपति राजवट लागू करावी या मागण्यांचे निवेदन नागपुर जिल्हाधिकारी मार्फत भारताचे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, गृहमंत्री, अनुसूचित जनजाति आयोग, अनुसूचित जाती आयोग, भारतीय मानवाधिकार आयोग तसेच जागतीक मानवाधिकार परिषद ला पाठविन्यात आले.

भारतीय नागरिकांचे मानवीय अधिकार नाकारनाऱ्या व आरोपिंना पाठीशी घालनाऱ्या उत्तर प्रदेश सरकार विरुध्द मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आक्रोश नोंदविला.प्रसंगी प्रा. रमेश पिसे, धर्मेश फुसाटे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ति सोनकुसरे, सुमेध गोंडाने, संजय सुर्यवंशी, अंकुश मोहिले, रमेश कांबळे, अविराज थूल, विनय भांगे, विवेक शेवाळे, अजय सहारे, शुभाश मानवटकर, फूलसर सतीबवाने, प्रवीण पाटील, मिलिंद मेश्राम, आनंद चौरे,

देवेंद्र मेश्राम, सुनील कुमार इंगळे, सुमधु गेडाम, राकेश रामटेके, आशीष हुमणे, कांचन देवगडे, माया शेंडे, नालंदा गणवीर, प्रतिमा शेंडे, धम्मदीप लोखंडे, निशांत पाटील, भावेश वानखेडे, अजय बोरकर, अमरदीप तिरपुडे, प्रशांत नारनवरे, विशाल वानखेडे, लाहानु बन्सोड, नीर्भय बागडे, भरत लांडगे, संदेश खोब्रागडे, धम्मपाल लामसोंगे, मंगेश मेश्राम, देवेन्द्र डोंगरे, इ. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठय़ा संख्येने अंदोलानत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here