आषाढीच्या दिवशी श्री विठ्ठल भक्तांची मांदीयाळी…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

स्थानिक तेल्हारा शहरातील इंदीरा नगर येथील एकता मंडळ हे विविध समाजीक,धार्मिक प्रकारचे समाज ऊपयोगी कार्यक्रम घेत असुन या मुळे तेल्हारा शहर व तालुक्यात आपली नावलौकीकता कमावलेली आहे, अशातच आज आषाढी एकादशीचे औचित्य साधुन श्री हणुमान मंदीर येथे कोविड १९ चे पालण करत श्री विठ्ठलाच्या नामाच्या गजरासह समाज ऊपयोगी लोक गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता,

प्रार्थना स्थळात आहे स्मशान शांतता स्मशानातुन येते कींचाळणार्यी आर्ता तुझ्या पायरीशी पांडुरंगा माथा भयावह शांततेची आता संपुदे गाथा अशा प्रकारच्या आर्त स्वरात तेल्हारा शहरातील संगीत तथा गित गायन मध्ये स्वतः ला वाहुन घेणाऱ्या विवीध कलावंतांनी तथा श्रोत्यांनी आपल्या भजनांमधुन पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घातले,यावेळी सुरेख कंठ लाभलेल्या तेल्हारा येथील सौ.संगीताताई गावंडे, चैतन्य नळकांडे,

किसनराव पुदाके यांनी विविध प्रकारचे भजने म्हणत त्यांना तबल्याची व ढोलकची साथ बंटी तायडे,गजानन जवळकार,अमोल लाटे, तसेच हार्मोनियमची साथ अर्जुन बायड, अक्टोपँडची साथ निलेश लव्हाळे यांनी दीली,अशातच योगायोग म्हणुन वडशिंगी येथील ह.भ.प.कु.सुरेखाताई वाघ ह्याही ऊपस्थीत होत्या या कार्यक्रमाच्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी एकता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गजानन गायकवाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here