अतिरीक्त बससेवा देण्यास आगार प्रमुखांची मान्यता…

चिखली:- जेईई इंट्रंन्स इक्झाम या स्पर्धा परीक्षेच्या पेपर साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली शहराध्यक्ष रविंद्र तोडकर यांनी आगार प्रमुख यांची भेट घेऊन निवेदन देताच शेगाव अतीरीक्त बस सेवा देण्यास आगार प्रमुखांनी मान्यता दिली आहे.

सविस्तर असे की, दि.25 फेब्रुवारी 2021 रोजी जेईई इंट्रंन्स इक्झाम या स्पर्धा परीक्षेच्या पेपर आहे आणी या परीक्षेसाठी बुलडाणा जिल्हयातुन बुलडाणा व शेगाव हे दोनच परीक्षाकेंद्र देण्यात आले आहे व केंद्रावर सकाळीच 8.00 वाजता हजर राहावे लागणार असल्यामुळे परीक्षार्थी व पालक यांच्यात चिंता वाढली होती

की शेगाव ला वेळेवर परीक्षाकेंद्रावर हजर हौता येईल की नाहि या ही विषयी काही पालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ विषयाची दखल घेत चिखली आगार प्रमुख यांना निवेदन देऊन विनंती केली

चिखली ते बुलढाणा व चिखली ते शेगाव अशी बस सेवा अतिरिक्त सुरू करावी अगर प्रमुखांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन बस सेवा देण्यास तात्काळ मान्यता दिली यावरून पालकांमध्ये व परीक्षा आरक्षण मधील चिंता दूर झाली निवेदन देतेवेळी रवींद्र तोडकर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व प्रशांत भैय्या डोंगरदिवे हे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here