बिएलओ (BLO) महिला कर्मचाऱ्यांचे २ वर्षाचे मानधन लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा करा : जगदीश (बालु) बावनथडे़ यांचे तहसीलदारांना निवेदन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

तिरोडा तालुक्यातील बिएलओ ( BLO ) महिला कर्मचाऱ्यांचे मागील २ वर्षा पासुनचे मानधन न मिळाल्या मुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश ( बालु ) बावनथडे़ यांच्या कडे धाव घेतली असता जगदीश बावनथडे़ यांनी या संपूर्ण विषयावर विशेष लक्ष दिले व त्यांनी तिरोडा तालुक्यातील अनेक बिएलओ ( BLO ) महिला कर्मचाऱ्यांना एकत्रित केले व त्यांच्या मागण्यांसाठी तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले.

असतांनी जगदीश बावनथडे़ यांनी तहसीलदार ह्या विषयावर चर्चा केली व त्यांना निवेदन देऊन विनंती केली कि ह्या गोरगरीब महिलांच्या हक्काचे मागील 2 वर्षा पासुनचे मानधन जे मिळाले नाही ते संपूर्ण लवकरात लवकर मिळायला हवं,आपणास ह्या विषयावर विशेष लक्ष देऊन कार्य करायचे आहे,

तहसीलदार यांनी सुद्धा जगदीश बावनथडे़ यांच्या विनंती व चर्चे नंतर म्हणाले कि 8 दिवसांमध्ये सर्वांच्या खात्यात बाकी असलेले मानधन जमा करून बिएलओ ( BLO ) कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन तहसीलदार यांनी दिले.

यावेळी बिएलओ ( BLO ) कर्मचारी सरीता हट्टेवार, अश्विनी हट्टेवार, कल्पना कटरे, दर्शना बोरकर, मंदा बारेवार, पुष्पलता पटले, शिशुकला बावनकुळे, शोभा रहांगडाले, भुमेश्वरी कटरे, रेखा भैरम, इंदु बिसेन, सिमा कोटांगले, हेमलता झगेकार, माला चौधरी,

भुमेश्वरी गौतम, उषा टेंभरे, प्रमिला उइके, मंदा वास्निक, शालु बहेकर, कल्पना चौधरी, निता शेंडे, दिशा बिसेन, आशा कोकुडे, मंगला सपाटे, संगिता पारधी, शारदा कटरे, सुरेखा पारधी, कुंदलता आगासे, उषा परिहार, रजनी नागदेवे, हेमलता उदापुरे, उषा पटले, पुष्पलता पटले उपस्थित होत्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here