देवलापार पोलिसांनी दिले कत्तलखान्यात जाणाऱ्या ६ गोवंशाना जीवदान, राष्ट्रीय महामार्ग सावरा टी पॉईंट वरील घटना…

एक आरोपी व वाहनसह ४ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

आज १५ जुलै रोजी पोलीस स्टेशन देवलापार येथील ठाणेदारांना गोपनिय माहिती मिळाली कि गर्रा मानेगाव टेक मार्गे कत्तलीसाठी जनावरांची अवैध वाहतूक होणार आहे.अशा माहितीवरून पोलिसांनी मानेगाव टेक येथे नाकाबंदी लावली आसता.एक पीकअप वाहन गर्रा रस्त्याने येतांना दिसला. त्यास पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला पंरतू चालकाने सदरचे वाहन नाकाबंदी ठीकाणी न थांबवता नागपूरचे दिशेने पळून जात असतांना नाकाबंदीच्या ठिकाणी उपस्थित आसलेल्या पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सावरा टी पांइट जवळ अडविला.

वाहन क्रमांक एम.एच .३०/ ए.बी.४२३६चे पोलिसांनी निरीक्षण केले असता पीकअप मध्ये ६ गोवंशाना अतिशय आखूड़ दोराने अमानुषपणे बांधून कत्तलखान्यात कत्तली करीता नेत असल्याची कबुली आरोपी सचिन धनराज हींगे राहणार कामठी याने दिली.

आरोपी जवळून पोलिसांनी ६ गोवंश अंदाजे किंमत ६०हजार रुपये व पिकअप वाहण किंमत .४लाख २५हजार रुपये असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून यातील आरोपी ला अटक केली असून त्याचे विरुद्ध पो.स्टे.देवलापार येथे अपराध क्र.१२१ /२०२१ कलम १९,कलम११ ( १ )( घ )( ड )( च ),प्रा.छ.अधि.सह कलम ५ ( अ ) ,९, मा.प्रा.सं.अधि.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गोवंश देवलापार येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहे.

ही कार्यवाही ही देवलापारचे ठाणेदार प्रविण बोरकुटे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि केशव पुंजरवाड, मिथीलेश पांडे,प्रमोद मडावी,गजानन कविराजवार,गजानन जाधव यांनी केली.घटनेचा पुढील तपास पो.उप.नि.केशव पुंजरवाड करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here