आशा वर्कर व गटप्रवर्तक यांचे तेल्हारा तहसील कार्यालयासमोर निदर्शने…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

विविध प्रलंबित मागण्यांसाठी व दिवाळीपूर्वी वेतन देण्यात यावे, या मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आज तेल्हारा तहसील कार्यालय येथे निदर्शने केली.या संदर्भात त्यांनी तेल्हारा तहसीलदार यांच्याकडे निवेदनही दिले. या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास एक नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे.

आशा वर्कर्स गटप्रवर्तक यांना पाच महिन्यांचा मोबदला विनाविलंब व कोणतीही कपात न करता दिवाळीपूर्वी भाषांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावा, आशांना पंधराशे रुपयेची मंजूर केलेली वाढ ही वाढीव मोबदलासह देण्यात यावी, कोविड लसीकरण मोबदला देण्यात यावा, संपामुळे पैशांच्या मोबदल्यात कुठलीही कपात करण्यात येऊ नये या व इतर मागण्यांसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेतर्फे हे निदर्शने करण्यात आली.

या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास एक नोव्हेंबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या संघटनेने दिला आहे. अध्यक्ष.मीना वानखडे उपाध्यक्ष.रंजना वानखडे उपाध्यक्ष विद्या गावंडे. चित्रा दुतडे.आशा राऊत सुमित्रा हागे अर्चना दामले संगीता डांगे सुषमा लापुरकर .वर्षा मानेकर .मीरा मुरकुटे. बबीता हागे .आशा व गटप्रवर्तक संघटना संघटनेचे सर्व सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूर, हिवरखेड, अडगाव पंचगव्हाण .येथील सर्व आशा उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here